मंगळवेढा तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अँड. रविकिरण कोळेकर व शहर अध्यक्ष पदी मनोज माळी यांची निवड
मंगळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अँड. रविकिरण कोळेकर यांची व शहर अध्यक्ष पदी मनोज माळी यांची निवड करण्यात आली. कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आ. प्राणितीताई शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी व युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य युवकांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी तसेच पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत व तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शुभेच्छा दिल्या
या वेळी निवडीचे पत्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते व युवकचे जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार व प्रदेश सचिव प्रविण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी सोलापुरचे माजी नगरसेवक विनोद भोसले, अँड बापूसाहेब यादव, अँड प्रकाश घुले आदीजण उपस्थित होते
सदरच्या निवडीबद्दल प्रदेश प्रांतिक सदस्य ॲड.नंदकुमार पवार,माजी तालुकध्यक्ष प्रा.शिवाजी काळुंगे, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, शहर अध्यक्ष राजाभाऊ चेळकर , ओबीसी अध्यक्ष पांडुरंग माळी महिला तालुका अध्यक्षा जयश्री कवचाळे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड.अर्जुन पाटील,विठ्ठल आसबे, पांडुरंग चौगुले,दादासो पवार, अमोल म्हमाणे, विष्णु शिंदे जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, पांडुरंग जावळे मतदार संघ अध्यक्ष मारुती वाकडे, मतदार संघ उपाध्यक्ष भिमराव मोरे, शिवशंकर कवचाळे मुबारक शेख, शहाजान पटेल,नाथा आयवळे, प्रवीण दत्तू, सैफन शेख, बापू अवघडे, संदीप पवार, तसलीम आकुंजी रमीजराजा मुल्ला रवींद्र शिवशरण, फारूक मुजावर, रज्जाक शेख आदींनी अभिनंदन केले.