पंढरपूरमंगळवेढासोलापूर

भाजपा ओबीसी मोर्चा चे प्रदेशध्याक्ष संजय गाते आज सोलापुर जिल्हा दौरा!

मंगळवेढा(प्रतिनिधी) भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष संजय गाते हे शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्यातील पुढील दौरा सुरू करणार असून कुर्डुवाडी येथे त्यांचे पहाटे पाच वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर ते मोटारीने शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी 7 ते 9 या वेळेत विठ्ठल मंदिरात जाऊन ते विठ्ठल रुक्मिणी माते चे दर्शन घेणार आहेत. सकाळी 10.30 वाजता माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत.सकाळी 11 वाजता मार्केट कमिटी हॉल पंढरपूर येथे ओबीसी मोर्चा चे पदाधिकारी व जिल्हा कार्यकारणीची बैठक घेऊन आगामी आणि @9मोदी जनसंपर्क अभियानाचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्या नंतर लगेचच राज्य कार्यकारणी सदस्य अॕड.सुहास माळवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेणार असून वरील कार्यक्रम आटोपल्या नंतर ते सोलापूर कडे प्रयाण करणार असून दुपारी 3 वाजता सोलापूर येथील भाजप शहर कार्यालयामध्ये बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तरी सर्व तालुका अध्यक्षांनी महिला, पुरुष व युवक अशा कार्यकारणीची संपूर्ण टीम घेऊन बैठकीला हजर राहावे असे अवाहन भाजपा ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close