मंगळवेढा(प्रतिनिधी) कमळाच्या प्रत्येक पाकळीवर प्रभू श्रीरामाचे नाव आहे,विधानसभेकडून लोकसभेकडे लक्ष्मणाची धाव आहे या कवितेतून कवी शिवाजी सातपुते यांनी सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेवर लक्ष्मण ढोबळे हे लोकसभेच्या उमेदवारीसाठी दावेदार असल्याची कवितेतून मांडली. शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कविसंमेलनाचे आयोजन केले होते.कविसंमेलनाचे उद्घाटन माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी आनंद लोकरे, औदुबर वाडदेकर, भारत पाटील,हजरत काझी, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड कोमल साळुंखे,मनिषा सानप, प्राचार्य चिदानंद माळी, विश्वंभर काळे, कृष्णदेव चौगुले, कांतीलाल इरकर बसवराज कोरे, शशिधर पाटील दादासाहेब वाघमारे आधी उपस्थित होते कविसंमेलनात नारायण पुरी, अविनाश भारती, शिवाजी बंडगर,अनंत राऊत, खलील मोमीन, डी.के.शेख, नितीन चंदनशिवे,भरत दौंडकर ,शिवाजी सातपुते, रमजान मुल्ला, आणि तालीब सोलापूरी हे सहभागी झाले. सांगोल्याचे कवी शिवाजी बंडगर यांनी ओय साहेब लागू द्या पाय,अनुभव घ्यावा कशीय शेतीय या कवितेतून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांला शेती करतानाचा अनुभव आणि शासकीय उपाययोजनेचा कागदोपत्री अंमलबजावणीवर आधारीत खदलाबदली या शेतकरी प्रश्नावर कवितेतून आवाज उठविला. आबा पाटील यांनी सध्याच्या राजकीय नेत्याच्या पक्षांतरावर नेम नाही आमचा नेता कुठल्या पक्षात हाणील उडी म्हणून आम्ही खिशात सगळे झेंडे ठेवले घालून घडी ही कविता सादर केली. तालीब सोलापूरी यांनी घरातील पत्नीच्या हुकूमशाहीवर मेरे आगे क्यो रोता है,आखो मे पानी मत लाना.इश्क मे मत जादा उचलना,हु बोलने क्या,और लेकर चलने क्या ,
तारे मंगेगी,तो सिदा घरको आणा! रमजान मुल्ला यांनी अंतराच्या किंकाळीने बधीर झालो, बुका झालो गुलाल झालो अबीर झालो ,मला वाटले चोखोबा कबीर झाले. नितीन चंदनशिवे यांनी हरवलेल्या प्रियकराची अवस्था व अनेक पक्षाकडे फिरणाऱ्या नेत्याची अवस्था कवितेतून दाखवून दिली. कवि प्रा.सुरेश शिंदे यांनी सध्याच्या परिस्थितीत अनेक नेते सत्तेसाठी कोणतेही पक्षात उड्या मारतात त्यामुळे जनतेचे अनेक प्रश्न निर्माण होतात त्यावेळी कलावंत हा जनतेचे प्रश्न मांडू शकतो. तत्पुर्वी ग्रामस्वच्छता अभियानावर आधारित नाटक वास इस दास ही नाटीका सादर करण्यात आली.