मंगळवेढा(प्रतिनिधी)सोलापूर जिल्हाचे माजी पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे निमंत्रीत सदस्य लक्ष्मणराव ढोबळे यांच्या ७० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंगळवेढा येथील जुन्या पोलीस स्टेशन समोरील मारूती पटांगणात दि. १८ मे रोजी सायंकाळी ४ वाजता समस्त मंगळवेढेकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
त्यानंतर सायंकाळी ६ वा. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक,दिग्दर्शक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या माझे जगणे होते गाणे या सर्वोत्कृष्ट मैफलीचेही आयोजन करण्यात आले असून सर्वांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन शाहू शिक्षण संस्थेचे संचालक व बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशध्याक्षा अॕड.कोमल साळुंखे-ढोबळे यांनी केले आहे.