रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन
रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुल भैय्या शहा नागरी गौरव सत्कार समितीचे प्रमुख राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी दिली आहे. आज सायंकाळी 6 वाजता स्वरनिनाद कोल्हापूर निर्मित सत्यम शिवम सुंदरम या मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.व सायंकाळी 7 वाजता रतनचंद शहा सहकारी बँके समोरील पटांगणा मध्ये रतनचंद शहा सहकारी बँकेचे चेअरमन राहुल शहा यांचा 51 वा अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी त्यांचा नागरी सत्कार समारंभ तसेच पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रतनचंद शहा सहकारी बँक लिमिटेड मंगळवेढा च्या वतीने बँकेच्या ग्राहकांसाठी क्युआर कोड आणि भारत बिल पेमेंट या दोन सुविधांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या शुभहस्ते,प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांचे आमदार समाधान आवताडे, आमदार प्रणितीताई शिंदे, विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा जिल्हाकार्याध्यक्ष उमेश पाटील,धनश्री परिवाराचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे सर,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव अवताडे, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, विठ्ठल शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील, जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव, दामाजी शुगर चे व्हाईस चेअरमन तानाजी खरात,माजी चेअरमन अँड.नंदकुमार पवार, रामचंद्र वाकडे , दामाजी शुगर चे माजी संचालक रामकृष्ण नागणे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन नीलाताई आटकळे विठ्ठल शुगरचे माजी चेअरमन भगीरथ भालके आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सत्कार समारंभस सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन राहुल भैय्या शहा नागरी गौरव सत्कार समितीचे प्रतिक किल्लेदार यांनी केले