मंगळवेढा

मंगळवेढा बाजार समिती निवडणूक जिंकण्यासाठी तयारीला लागा-आ.समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाली असून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आपण ही निवडणूक लढणार असून भाजप पक्ष व गट मोठा करण्यासाठी सगळ्यांनी तयारीला लागा विजय आपलाच असेल असा विश्वास आमदार समाधान आवताडे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केला
सोमवारी दुपारी दोन वाजता आमदार आवताडे यांच्या सूतगिरणीच्या सभागृहामध्ये कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी आमदार अवताडे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या राज्यात व देशात भाजपची सत्ता आहे निधीच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडणार नाही सभापती सोमनाथ अवताडे यांनी बाजार समितीमध्ये उत्कृष्ट व पारदर्शक कारभार करत राज्यात बेस्ट सभापती म्हणून पुरस्कार मिळवला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बाजार समितीच्या निवडणुकीला आपण सामोरे जाणार असून प्रत्येक कार्यकर्त्याने ही माझी निवडणूक आहे असे समजून कामाला लागा जे चांगल्या विचाराचे लोक आपल्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जाणार असून बाजार समितीतील पाच वर्षाचे कामकाज पाहता प्रत्येक सभासद आपल्या सोबत आहे त्यामुळे आपण बाजार समिती जिंकणार आहोत अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली या बैठकीमध्ये संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक केदार माजी संचालक तानाजी पाटील सोमनाथ अवताडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ अवताडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर, दामाजीचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी, सुधाकर मासाळ, सूर्यकांत ढोणे, धनंजय पाटील, तानाजी पाटील, चंद्रकांत पडवळे,रावसाहेब चौगुले, रावसाहेब मेटकरी, दीपक सुडके,जगन्नाथ रेवे, लक्ष्मण नरोटे, राजन पाटील, सुनील कांबळे, दत्ता साबणे,बटुअप्पा पवार,सुरेश भाकरे, भारत कोळेकर, अशोक केदार ,बसवंत पाटील, सचिन शिवशरण ,मच्छिंद्र सरगर,
यांचे सह विविध गावचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close