नगरपरिषदेकडून विविध कार्यक्रमाद्वारे शिवजयंती उत्साहात साजरी
मंगळवेढा(प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त विविध कार्यक्रम उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करणे बाबत दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी परिपत्रक जारी करणेत आले. यामध्ये शहरांतील व कार्यालयांतील पुतळे असणा-या ठिकाणी रंगरंगोटी, साफसफाई व सुशोभिकरण करुन व छोटेखानी सांस्कृतिक समारंभाचे आयोजन करण्याबाबत सुचित करणेत आले. त्यानुसार नगरपरिषदेकडून विविध कार्यक्रम करत शिवजयंती साजरी केली. महाराष्ट्र शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राज्यगीत म्हणून अंगिकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दिनांक 18 फेब्रुवारी रोजी राज्यगीतांचा प्रसार व जनजागृती करणेकामी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे हे राज्यगीत स्पीकरवरून लावून शहरांतून मोठ्या उत्साहात महिलांची मशाल फेरी शहरांतील मुख्य मार्गावरुन काढणेत आली. या रॅलीमध्ये नगरपरिषद महिला बचत गट, कॉलेज युवती, नगरपरिषद महिला कर्मचारी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 75 मशाली पेटवून या रॅलीमध्ये भाग घेतला होता. यामध्ये संगीता रजपूत, माधुरी हजारे, शोभा कुचेकर, सुनिता चव्हाण, आशा पाटील यांनी नियोजन करुन कार्यक्रमाची शोभा वाढविली. नगरपरिषद कार्यालयामध्ये शहरांतील प्रतिष्ठित नागरीक, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मा. पापाशा अब्बास पटेल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यांत आला. हिंदु मुस्लीम बंधुत्व जपत शिवजयंती साजरी करण्यांत आली. या वेळी खूप मोठया प्रमाणांत मुस्लीम बांधव उपस्थित होते. त्यानंतर ध्येय मंत्र शशिकांत चव्हाण यांनी व इसहाक शेख यांनी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमांची सुरुवात केली. त्यानंतर सभागृहामध्ये जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत लावून सर्वांनी उभे राहून या गीताचा सन्मान करणेत आला.या कार्यक्रमात मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी शिवचरित्र आणि भारतीय राज्यघटना यामधील साम्यस्थळे समजावून सांगितली. समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, या बाबतीतील स्वराज्यांतील घटना, प्रसंगावर राम पवार, बाबा पवार आदींनी माहिती सांगितली. नगरपरिषदेमध्ये खुप मोठया प्रमाणांत सजावट करून ठिकठिकाणी भगवे झेंडे, पताका, नगरपरिषद इमारतीवर लाईटिंग व सर्व कर्मचा-यांनी भगवे फेटे परिधान करणे यामुळे वातावरण अतिशय आनंदी व उत्साही व शिवमय झाले. यावेळी प्रकाश गायकवाड, प्रविण खवतोडे, अविनाश शिंदे,रामकृष्ण नागणे, शिवाजीराव पवार, फिरोज मुलाणी,शशिकांत चव्हाण,गौरुदादा बुरुकुल,डॉ.नंदकुमार शिंदे,भारत पवार, तोडकरी,हजरत काझी, दिलावर मुजावर,जयदीप रत्नपारखी, सुलेमान तांबोळी, जावेद मुल्ला, बबलु सुतार, शौकत सुतार, दावल इनामदार, सुदर्शन यादव,सुशांत हजारे,अरुण किल्लेदार,कट्टे सर,या सह मंगळवेढा नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुपरेषा व सुत्र संचालन विनायक साळुंखे, प्रशासनाधिकारी यांनी केले.