कल्याण पश्चिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा संवाद कार्यक्रम संपन्न!
कल्याणमधील शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्षरीत्या व देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला, त्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण कल्याण पश्चिम या ठिकाणी दाखविण्यात आले, त्यामध्ये कल्याण पश्चिम येथील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. के. सी. गांधी शाळेच्या विद्यार्थ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला.
यश-अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरं जा, असा कानमंत्र पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत म्हणाले- आईकडून वेळेचे व्यवस्थापन शिका, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी थेट संवाद साधत परीक्षेच्या तणावावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदीजी यांनी शिक्षण आणि करिअरशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मतानुसार, 38 लाख विद्यार्थ्यी सहभागी झाले. त्यापैकी 16 लाखांहून अधिक राज्य मंडळांचे आहेत. गेल्या वर्षीच्या नोंदणीपेक्षा हे प्रमाण 15 लाखांनी अधिक आहे. दरम्यान कल्याण पश्चिममधील 32 शाळांनी चित्रकला स्पर्धेतही सहभाग घेतला होता. त्याची सर्व व्यवस्था भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली होती. दरम्यान परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातही नरेंद्र पवार यांनी उपस्थिती लावत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार, अनिलजी पंडित, प्रिया शर्मा, कल्पेश जोशी, प्रताप टूमकर, स्नेहल सोपारकर, दिपा शाह, समृध्द ताडमारे, रविंद्र म्हाडीक, जयश्री देशपांडे, के.सी.गांधी हायस्कूल मुख्यध्यापिका अंजली तिवारे मॅडम,जोसफ सर, रानडे मॅडम, राजपूत सर, आदी. पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.