पंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

मनोजकुमार यादव यांना केंद्र शासनाचे आंतरिक सेवा पदक प्रदान!

मंगळवेढा(प्रतिनिधी)मारापुर ता.मंगळवेढा येथील सुपुत्र असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार माधवराव यादव यांना केंद्र शासनाकडून आंतरिक सेवा पदक घोषित करण्यात आले आहे. ते सध्या राज्य पोलीस दलात कार्यरत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मारापुर सारख्या ग्रामीण भागातून जाऊन त्यांनी 1985 मध्ये इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून यश मिळवून ते 1995 साली पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाले. त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला. मुंबई, चाकण,लोणावळा,रांजणगाव ,सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखा इत्यादी ठिकाणी त्यांनी उत्कृष्ठ सेवा बजावली. अत्यंत करड्या शिस्तीचे प्रशासकीय अधिकारी असलेल्या श्री. यादव यांनी नागपूर येथे पोलीस दलात असताना अंतर्गत सुरक्षा मोहिमेत मोलाची कामगिरी केल्याने केंद्र शासनाने त्यांना आंतरिक सुरक्षा पदक जाहीर केले. त्यांना मिळालेल्या पदकांबद्दल पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे, आवताडे शुगरचे चेअरमन श्री संजय आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा चेअरमन सोमनाथ आवताडे, मारापूरचे विद्यमान सरपंच विनायकराव यादव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खंडेकर, मारापूरचे उपसरपंच अशोक आसबे, युवा उद्योजक राजकुमार यादव व सर्व मारापुर ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close