पंढरपूरमंगळवेढासोलापूर

महमदाबाद(शे)ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आ.समाधान आवताडे गटाच्या सुवर्णा नवत्रे यांची बिनविरोध निवड!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद(शे) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आ समाधान आवताडे समर्थक सुवर्णा दत्तात्रय नवत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली, ठरल्याप्रमाणे एक वर्षानंतर पद्मिनी सिद्धेश्वर म्हमाणे यांनी राजीनामा दिला होता त्या रिक्त जागेसाठी सोमवारी अध्यासी अधिकारी डी डी पोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी ठरल्याप्रमाणे सुवर्णा दत्तात्रय नवत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच पदासाठी सुवर्णा नवत्रे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.गावपातळीवर आघाडी करून तरुणांनी एकत्र येत निवडणूक लढविली होती निवडून आलेल्या सात सदस्यांमध्ये पाच वर्षात पाच जणांना सरपंचपद व दोघांना उपसरपंचपद बहाल करण्यात येणार आहे या निवड प्रक्रियेला ग्रामसेवक बी एस पाटील,तलाठी विनोद भडंगे ,कोतवाल बसवेश्वर बुडबुडे, यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच आण्णासाहेब सुडके,संतोष सायबु सोनवले,सदस्या,मयुरी सचिन बोडके,स्वाती बसवेश्वर सुडके,पद्मिनी सिद्धेश्वर म्हमाणे,सरिता सुनील सुडके हे उपस्थित होते.
या निवडीला भाजप जिल्हा युवक उपाध्यक्ष सचिन बोडके,बसवेश्वर सुडके,दीपक नरळे,दत्तात्रय करांडे, मनोहर जुंदळे,भीमराव पाटील,दत्तात्रय जुंदळे ,प्रकाश जुंदळे,राजाराम नरळे,गणेश पाटील,सुनील सुडके,ज्ञानेश्वर नरळे,नागनाथ नरळे, प्रशांत शिलवंत,संतोष बोडके,जगन्नाथ करांडे,बलभीम बोडके,बालाजी नरळे,चंद्रकांत सुडके,अमर नरळे,धर्मराज सुडके,तानाजी सुडके,बंटी सुडके,मारुती नरळे,नवनाथ म्हमाणे,संजय सुडके,नंदू ढंगीकर,सुरज सुडके,हणमंत जुंदळे,बाळू सरवदे,विठ्ठल नरळे,पोपट नरळे,लक्ष्मण म्हमाणे,दादा शिरतोडे,दीपक तोडकरी,प्रशांत पाटील,बलभीम सुडके,ज्ञानेश्वर मेटकरी,साखऱ्याप्पा सोनवले,अच्युत सुडके,विजय कांबळे,गणेश तोडकरी,तुकाराम नरळे,औदुंबर सोनवले,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close