मंगळवेढा(प्रतिनिधी)लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. पी. बी. पाटील यांच्या गटाकडून सत्ता खेचून युवा उद्योजक विनायक यादव यांची सरपंच पदी जनतेतून निवड झाली असून तर उपसरपंच निवडीसाठी सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी सौ. सुवर्णा अशोक आसबे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निरीक्षक एम. यु. कौलगे यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिलेला उपसरपंच पदाचा मान मिळाला.
उपसरपंच निवडीनंतर बोलताना सरपंच विनायक
यादव म्हणाले की विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली मारापुर ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत बनवण्याचा मानस आहे त्यामध्ये प्रामुख्याने वीज, पाणी, अंतर्गत रस्ते, आरोग्य उपकेंद्र, जिमखाना त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या वतीने मोफत वायफाय सेवा देण्यात येणार आहे तसेच मारापुर तावशी रोड वरती मान नदीवर बंधारा कम ब्रिज बांधण्यास प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
यावेळी ग्रामसेवक प्रसाद देवकर, विजयाचे शिल्पकार राजकुमार यादव, भगवान आसबे, भुजंगराव आसबे, अमोल जानकर ,डॉ. सत्यवान यादव, अशोक यादव, बालाजी यादव, नाथा माने, अनिल माने, संतोष गांडुळे, सतीश वाघमारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब यादव ,सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य व मारापुर ग्रामस्थ उपस्थित होते