पंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

सहाय्यक फौजदार विठ्ठल शिंदे यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल मंदिर समितीच्या वतीने बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सन्मान…!

पंढरपूर(प्रतिनिधी) श्री संत तुकाराम भवन च्या परिसरात एका श्री विठ्ठल भक्ताची ५ ग्राम ७०० मिली वजनाची सोन्याची चैन सापडली. त्या वेळेस तेथे कर्तव्यावर हजर असणारे मंदिर सुरक्षा सहाय्यक फौजदार विठ्ठल यल्लप्पा शिंदे यांनी ती पाहिली,व तात्काळ श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे माहिती केंद्र येथे माहीती देऊन तात्काळ स्पिकरवरून सदर गहाळ सोन्याचे दागिने सापडली असून ओळख पटवून ती घेऊन जाण्याची सुचना देण्यात आली. परंतु दि.३०/१२/२०२२ सायं ५.०० वा पर्यंत कोणीही भाविक आले नसल्याने ती सोने चैन श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती कार्यालयात जमा करण्यात आले . त्यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सहाय्यक फौजदार विठ्ठल यल्लाप्पा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close