मंगळवेढा(प्रतिनिधी) श्री संत दामाजीनगर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 2 मध्ये दोन महिला व एक 17 वर्षीय मुलगा डेंग्युसदृश्य आढळल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान,ग्रामपंचायत कर्मचार्यांनी रविवारी या परिसरात डेंग्युला अटकाव करण्यासाठी औषध फवारणी केली तसेच नागरिकांनी कोरडा दिवस पाळला.
दामाजीनगर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 2 मध्ये तीन डेंग्युसदृश्य रूग्ण आढळून आले आहेत.यामध्ये दोन महिला उपचार घेवून घरी परतल्या. तर एक मुलगा अदयापही दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले.डेंग्युचा फैलाव रोखण्यासाठी येथील ग्रामपंचायत सरपंच जमीर सुतार,सदस्य आण्णासाहेब आसबे,लक्ष्मण गायकवाड यांनी तहसीलदार स्वप्नील रावडे व गटविकास अधिकारी शिवाजी पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून या गंभीर आजाराबाबत माहिती देवून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी केली.रविवारी बोराळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.शेख, आरोग्य सेवक विठ्ठल क्षीरसागर, ग्रामसेवक मोरे,अंगणवाडी सेविका ज्योती गायकवाड,आशा वर्कर जयश्री मस्के,स्वाती घोडके,मदतनीस उज्वला गावकरे,ग्रा.पं.कर्मचारी नरेश धनवे,वसीम मुजावर,पवार आदी पथकाने घरोघरी भेटी देवून कोरडा दिन पाळण्यासाठी सहकार्य केले. तसेच या आजाराबाबात जनजागृती करून नागरिकांना डबक्यात,टायरमध्ये पाणी साठणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.मागील दोन महिन्यापुर्वी कारखाना रोडलगत असलेल्या कॉलनीतही डेंग्युसदृश्य रुग्ण आढळले होते