मंगळवेढा(प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी अपशब्द व अर्वाच्य भाषा वापरली. याचा शहरातील चोखामेळा चौकात बोंबाबोंब आंदोलन करून भुट्टो यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ‘नरेंद्र मोदी आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा सचिव संतोष मोगले, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, जिल्हा सचिव सिद्धेश्वर कोकरे,माजी तालुकाध्यक्ष अशोक माळी, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस विजय बुरकुल,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री सुदर्शन यादव, ओबीसी युवक आदित्य मुदगुल, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे, सरचिटणीस अजित लेंडवे, साईनाथ शिंदे, बबन ननवरे, बंडू बुरकुल, सौरभ कनुरे, दामाजी गायकवाड, प्रशांत पावले, सतीश घटनटे,आदी उपस्थित होते.
Check Also
Close