मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. 18 ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसर्या दिवशी सरपंचपदासाठी 9 तर सदस्य पदासाठी 79 असे एकूण 88 उमेदवारी अर्ज बुधवारअखेर प्राप्त झाल्याचे नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे यांनी सांगितले.
मंगळवेढा तहसील कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. तहसील कार्यालयात ग्रामपंचायतनिहाय अर्ज स्वीकारले जात आहेत. जनतेतून १८ सरपंच आणि १५४ सदस्य अशा १७२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. गाव नेत्यांकडून आपली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
गावनिहाय संख्या उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे -भालेवाडी-सरपंचपद 1,सदस्य-9,पौट -सरपंचपद 1,सदस्य-13,ढवळस सरपंचपद 1,सदस्य 5,शिरनांदगी- सरपंचपद 0,सदस्य -3,मारोळी -सरपंच 0,सदस्य -3,डोंगरगांव-सरपंच-3,सदस्य-8,हाजापूर -सरपंच 1,सदस्य-3,येड्राव -सरपंच1,सदस्य-13,मारापूर-सरपंच 1,सदस्य-11,सोड्डी -सरपंच 0,सदस्य -4,तळसंगी सरपंच -0,सदस्य -2,पाटखळ -सरपंच 0,सदस्य -4,तर खोमनाळ,बावची,रहाटेवाडी,गोणेवाडी,फटेवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी सरपंच व सदस्यासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नाही. दि.2 डिसेंबरच्या दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी दाखल करण्याची मुदत असून दि.5 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी तर दि.7 रोजी दुपारी 3.00 पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेणे व 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत 18 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय आवारात 12 टेबल ठेवण्यात आले असून यासाठी 7 मंडल अधिकारी,18 तलाठी,पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आदी कर्मचारी नेमले आहेत. निवडणूक विभागाचे महसूल सहाय्यक उमाकांत मोरे हे परिश्रम घेत आहेत.