नूतन मराठी विद्यालयाचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उज्वल यश
मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नुतन मराठी प्रशालेतील तीन विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरीय निवड झाली. या स्पर्धेमध्ये नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान असे यश संपादन केले. 14 वयोगटांमध्ये सातवी मधील कु.प्रज्ञा नागनाथ जुदळे (प्रथम क्रमांक), कु.सानिका तानाजी सावंजी (तृतीय क्रमांक) आणि 17 वयोगटामध्ये दहावी मधील उज्वल नागेश कुलकर्णी याचा (द्वितीय क्रमांक) आला. या विद्यार्थी- विद्यार्थ्यांनीना सचिन घोडके,संदीप माळी, सुभाष गायकवाड,श्री राम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.आर. एन.कुलकर्णी ,उपाध्यक्षा निर्मलाताई पटवर्धन,संस्थेचे सचिव परशुराम महालकरी आणि सर्व संचालक मंडळ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता औताडे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुरुलिंग बंडगर,नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शाहू सतपाल,गटशिक्षणाधिकारी बजरंग पांढरे शिक्षक – शिक्षिका व कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.