पोलिस प्रशासनांची उडाली झोप;आजचा पाचवा दिवस तरी अपहरण झालेल्या रणवीरकुमार साहु चा लागेना ठाव ठिकाणा! पोलिसांनी रणवीरकुमारच्या शोधासाठी तयार केली पथके!
मंगाळवेढा(प्रतिनिधी)मंगळवेढा शहराजवळ असलेल्या एमआयडीसी परिसरातून दि १८ नोव्हेंबर २०२२ रोजी शुक्रवारी सायंकाळी अपहरण झालेल्या ४ वर्षे वयाच्या रणवीरकुमार साहू या छत्तीसगडच्या बांधकाम मजुराच्या अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यात घेण्यासाठी पोलिसांनी रात्र दिवस एक करत सर्व गोष्टी लक्षात घेऊन पोलीस तपास करीत आहेत. मात्र अद्याप पोलिसांना यश आले नाही. पोलिस अधिक्षक शिरिषकुमार सरदेशपांडे,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह विविध ९ पोलिस अधिकाऱ्यांची पथके कार्यरत आहेत.
अल्पवयीन मुलगा रणवीरकुमार साहू हा मंगळवेढा एम.आय.डी.सी.च्या समोर एका बांधकामाजवळ असताना अज्ञात व्यक्तीने त्याला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली.मात्र ही घटना घडल्यापासून चार दिवस झाले तरी अद्यापही पोलिसांचा तपास सुरूच आहे,पोलिसांनी शॉनपथकाच्या व ड्रोनच्या माध्यमातून तपास केला,२१ नोव्हेंबर रोजी दुपारी अचानक मुलाचा जेवणाचा डबा कुटुंब रहात असलेल्या ठिकाणा जवळ मिळाला,त्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील जवळपास २० नातेवाईकांचे फ्रिंगर प्रिंटस घेतल्याचे सांगण्यात आले आहे. अमावस्या असल्यामुळे पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून गस्त घालत आहे, पोलीस प्रशासनाने पोलीस पाटलांना दिलेल्या सूचनांचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाल्याने नागरिक सतर्क झाले आहेत,या पत्रात पोलीस पाटलांनी गावातील सर्व प्राचीन मंदिरे तसेच इतर सर्व मंदिरात रात्र गस्त घालून त्यावर लक्ष ठेवावे,गावातील मंत्र व तंत्रविद्या करणारे, देवर्षी लोकांवर बारकाईने नजर ठेवावी, गावात कोणी अनोळखी माणूस मंदिराच्या आसपास दिसल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी,कोणी अनोळखी महिला चार वर्षाच्या मुलासह दिसल्यास खात्री करावी,तसेच गावातील सर्व विहिरी ओढे, निर्जन स्थळे, गायरान जमीन या ठिकाणी पाहणी करावी, गावात अमावस्या निमित्त किंवा निर्जन ठिकाणी किंवा कोणाच्या घरी देवकार्य आयोजित केले असल्यास ते कोणत्या देवाचे व कशाकरिता केले? याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनास कळवावी, गावातील हिंदू व मुस्लिम स्मशानभूमीची पाहणी करून त्या ठिकाणी नवीन खड्डे पाडले आहेत का? किंवा पूजा केली आहे का? याबाबत माहिती घ्यावी,गावात चार-पाच दिवसांपूर्वी कुठे मूर्तीची स्थापना केली आहे का?याची गोपनीय माहिती काढावी त्याचबरोबर अमावस्येच्या तोंडावर कोणी काही कारण नसताना परगावी गेले असल्यास त्याचीही माहिती घ्यावी अशा सक्त लेखी सूचना पोलीस पाटलांना दिल्या आहेत.
या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव हे तळ ठोकून मंगळवेढ्यात असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढयाच्या डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील ,पोलिस निरिक्षक रणजित माने,सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे,बापूसाहेब पिंगळे,अंकुश वाघमोडे सत्यजीत आवटे या अधिकार्यांसह कर्मचारी प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहेत.
अपहरित मुलाचे नाव व वर्णन -रंग निमगोरा उंची तीन फूट ,चेहरा गोल अंगात नेसणेस पांढरे रंगाचा टी-शर्ट व काळे रंगाची हाफ पॅन्ट ,दोन्ही पायात काळा दोरा बांधलेला ,भाषा हिंदी बोलतो नाक सरळ, डोळे मध्यम असून माहिती मिळाल्यास मंगळवेढा पोलीसाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.