पंढरपूरमंगळवेढासामाजिकसोलापूर

मी वडार महाराष्ट्राचा च्या मंगळवेढा शहरध्याक्षपदी गणेश धोत्रे तर युवक शहरध्याक्षपदी किरण घोडके यांची एकमताने निवड!

  • मंगळवेढा(प्रतिनिधी)’मी वडार महाराष्ट्राचा’चे संस्थापक अध्यक्ष विजय दादा चौगुले यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात संघटन बांधणी सुरु असून संघटनेचे महाराष्ट् संपर्क प्रमुख सुधीर पवार व राज्य उपाध्याक्ष शंकर आण्णा चौगुले यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यातील निवडी जाहीर करण्यात आले असून सोलापूर जिल्हाध्यक्षपदी गौतम भांडेकर,सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दत्ताभाऊ गायकवाड,पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष पदी दत्ता भोसले तर पश्चिम महाराष्ट्र युवकध्याक्षपदी अमोल धोत्रे,सोलापूर जिल्हा युवाअध्यक्ष पदी अदित्य मुदगुल मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत पवार,शहरध्याक्षपदी गणेश धोत्रे तर मंगळवेढा युवा शहरध्यक्षपदी किरण घोडके यांची नियुक्ती करण्यात आली.                               या नवनियुक्त पदाधिकारी यांना मी वडार महाराष्ट्राचाचे संघटनेचे प्रदेशअध्यक्ष सुरेश धोत्रे,प्रदेश उपाध्यक्ष शंकर चौगुले,प्रदेश सचिव तानाजी पोवार यांचा हस्ते नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यातआले. यावेळी नुतन शहरध्यक्ष गणेश धोत्रे बोलताना म्हणाले समाजातील तळागाळातील प्रत्येकाला संघटनेच्या प्रवाह आणण्याचे प्रयत्न आणि सघटनेचे ध्येय धोरण रुजवण्याचे काम करणार आहे.                   वडार समाज समाजातील कोणत्याही व्यक्तींवर अन्याय होत असेल तर सोडवण्यासाठी आणि मदतीसाठी मी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे नियुक्ती नंतर गणेश धोत्रे यांनी व्यक्त केला. या निवडीबद्दल गणेश धोत्रे व किरण घोडके यांचे विठ्ठल परिवारचे नेते भगीरथ भालके,बाळासाहेबची शिवसेनाचे शहरध्यक्ष प्रतिक किल्लेदार,सोमनाथ माळी,विजय बुरकुल,राहुल वाकडे मित्रपरिवार यांनी सन्मान करुन अभिनंदन केले .
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close