बाळासाहेबांची शिवसेनेने दिली युवा उद्योगपती प्रतीक किल्लेदार यांना मोठी जबाबदारी!
मंगळवेढा(प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेनेच्या मंगळवेढा शहर प्रमुखपदी प्रतीक अरुण किल्लेदार यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी दिले आहे.
यावेळी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, जिल्हाप्रमुख चरण चवरे, युवा जिल्हाप्रमुख बालाजी बागल, जिल्हा उपप्रमुख दत्ता सावंत,तालुकाप्रमुख पैलवान अशोक चवंडे, पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर,नाना देशमुख आदीजन उपस्थित होते.
प्रतीक किल्लेदार हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. आपल्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंच्या हाताला काम मिळवून दिले आहे.तसेच त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाला निश्चितच फ़ायदा होणार आहे.
त्यांच्या निवडीनंतर मिस्टर माजी नगराध्यक्ष सोमनाथ माळी, भाजप किसान सेल जिल्हा सरचिटणीस विजय बुरकूल,डॉ.रवींद्र नाईकवाडी,संत चोखामेळा ग्रामपंचायतीचे सदस्य अमित गवळी,उद्योजक अभिजित मोरे,दिपक माने,बाबा कोंडुभैरी,बंठी रजपुत,आप्पा पट्टणशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.
मंगळवेढा शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्र्याबरोबर बैठक लावणार!
विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंगळवेढा शहराची हद्दवाढ, भुयारी गटारी योजना, शहरासाठी स्वतंत्र दुसरी पाईपलाईन यासाठी येत्या पंधरा दिवसांत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्र्याबरोबर बैठक लावणार.- प्रतीक किल्लेदार, शहरप्रमुख