मंगळवेढा(प्रतिनिधी) शाहु शिक्षण संस्था व सावली फाउंडेशन यांच्यावतीने बहुजन रयत परिषद आयोजित स्व.अनुराधा ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प चैतन्य महाराज वाडेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली. मंगळवेढा येथील शिशुविहार समोरील शाहु मैदानावर ता.29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या कीर्तन कार्यक्रम पोस्टरचे प्रकाशन माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे,प्राचार्य चिदानंद माळी,मुख्याध्यापक राजेंद्र पोतदार,मुख्याध्यापक प्रवीण गुंड,अंबादास पांढरे,जयंत डोलारे,कृष्णदेव चौगुले,औदुंबर ढावरे,राहुल चेळेकर आदी उपस्थित होते.
Check Also
Close