मंगळवेढा(प्रतिनिधी) लोकप्रतिनिधीला विश्वासात घेवून पोलीस अधिकाऱ्यांनी काम करावे,विश्वासात घेतले तरच चांगल्या समन्वयाने काम करता येईल असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.
मंगळवेढा येथील पोलिस उपविभागीय कार्यालयाच्या नवीन वास्तू उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. समाधान आवताडे,आ.सुभाष देशमुख,आ.सचिन कल्याणशेट्टी,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी,पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार स्वप्निल रावडे,सांगोला तहसीलदार अभिजित पाटील,पो. नि रणजीत माने, पो. नि. सुहास जगताप,मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे,ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे,भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत,दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील,धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस शशीकांत चव्हाण,भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल,माजी सभापती प्रदीप खांडेकर,पक्षनेते अजित जगताप, माजी आरोग्य सभापती प्रवीण खवतोडे,अॕड राहूल घुले,जयदीप रत्नपारखी ,युवराज घुले,बाबा कोंडुभैरी,विजय बुरकुल आदीसह पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले की,सध्या पोलीस यंत्रणेतील बदल कौतुकास्पद असून त्या पध्दतीने कामकाजातही बदल झाले पाहिजेत,समाजात जनजागृती झाल्याने माहितीची साधने जनतेकडे आल्याने सोशल मिडीयात सामाजिक तेढ निर्माण होणारे विषय वेगाने पसरले जातात, वाळूमाफीया,भुमाफीयामुळे भीमेचा काठ उद्ध्वस्त झाला, अवैध धंद्यातून मिळालेल्या पैशामुळे गुन्हेगारी वाढली त्याला अटकाव कसं करायचं यावर हे महत्त्वाचे असून पोलीस यंत्रणावरील कामाचा टाईम लक्षात घेऊन 22 हजार पोलीस भरती सरकार बदलानंतरही सुरू झाली. कार्यालयीन कामकाज ऑनलाईन झाल्याने नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन यावे लागणार नाही यासाठीचे नियोजन करावे त्यासाठी शासन पाठबळ देईल, जिल्हा नियोजन मधून निधी देखील देवू पण गुन्हेगारी कमी झाली पाहिजे,नवनवीन बदल पोलीस प्रशासनाने स्वीकारले पाहिजे. आ.समाधान आवताडे म्हणाले की,सगळी कार्यालये एकाच ठिकाणी व्हावी ही शासनाची भूमिका असल्याने सुरूवातीच्या काळापासून अनेकांनी योगदान दिल्याने नव्या इमारतीचे काम पुर्ण झाले.कमीत कमी गुन्हे दाखल होण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न करावेत,पोलीसांनी ताठर भूमिका घेतली तर मंगळवेढेकरही स्वाभिमानी व अधिक ताठर असल्याचे सांगत गुन्ह्यात सांमजश भुमिका घेण्याचे आवाहन केले.प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले की, मंगळवेढ्यातील उपविभागीय कार्यालयाला 2008 प्रशासकीय मान्यता मिळाली, अपुऱ्या निधीमुळे या कार्यालयाचे काम पुर्ण होऊ शकले नाही मात्र जिल्हा नियोजन कडून 22.40 लाखाच्या निधीतून हे काम पुर्ण झाले कार्यक्रमासाठी स.पो.नि.अशोक वाघमोडे,अमोल बामणे,बापू पिंगळे,सत्यजित आवटे,पोलिस उपनिरिक्षक अशोक बाबर,सहाय्यक फौजदार राजेंद्र जावळे,दत्तात्रय तोंडले,पोलिस हवालदार शिवाजी पवार,महिला पोलिस नाईक वंदना अहिरे, पोलिस अंमलदार प्रविण सांवत,प्रशांत चव्हाण,हसन नदाफ,जमिर मुजावर,राजाराम तानगावडे,संतोष चव्हाण,सुनील मोरे, तसेच मंगळवेढा व सांगोला उपविभागीय पोलिस कार्यालयातील अधिकारी, ठाणे अंमलदार ,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत. सूत्रसंचालन स्वाती बालके यांनी तर आभार अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी मांनले