मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे उदघाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हस्ते आज होणार!
मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय या नुतन वास्तूचे उदघाटन आज गुरुवार दि.17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.00 वा.सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मंगळवेढा उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी दिली.
मंगळवेढा तहसील कार्यालयाजवळ नव्याने मंगळवेढा उपविभागीय पोलिस कार्यालयाची इमारत उभारण्यात आली असून या कार्यालयाचे उदघाटनासाठी खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर,खा.ओमप्रकाशराजे निंबाळकर,आ.रणजितसिंह मोहिते पाटील,आ.अरूण लाड,आ.जयंत आसगावकर,आ.सुभाष देशमुख,आ.बबनराव शिंदे,आ.विजय देशमुख,आ.प्रणिती शिंदे,आ.शहाजी पाटील,आ.राजेंद्र राऊत,आ.संजयमामा शिंदे,आ.यशवंत माने,आ.समाधान आवताडे,आ.सचिन कल्याणशेट्टी,आ.राम सातपुते यांचेसह कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक मनोज लोहिया,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव आदी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलिस निरिक्षक रणजित माने व मंगळवेढा उपविभागीय पोलिस कार्यालयातील पोलिस उपनिरिक्षक अशोक बाबर,सहाय्यक फौजदार राजेंद्र जावळे,दत्तात्रय तोंडले,पोलिस हवालदार शिवाजी पवार,महिला पोलिस नाईक वंदना अहिरे, पोलिस अंमलदार प्रविण सांवत,प्रशांत चव्हाण,हसन नदाफ,जमिर मुजावर,राजाराम तानगावडे,संतोष चव्हाण तसेच मंगळवेढा व सांगोला उपविभागीय पोलिस कार्यालयातील अधिकारी, ठाणे अंमलदार ,कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहेत.