बिझनेससामाजिकसोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची काेंडी फुटली; ‘या’ साखर कारखान्याने दिली सर्वाधिक पहिली उचल!

पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडली असून पहिली उचल दाेन हजार चारशे रूपये जाहीर केली आहे. पहिल्या टप्प्यात गाळप झालेल्या शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी दिली. यंदाच्या हंगामात पहिली उचल दाेन हजार पाचशे रूपये जाहीर करावी या मागणीसाठी मागील एक महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यात ऊसदर संघर्ष समितीचे आंदोलन सुरू आहे. त्यानंतर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक दाेन हजार चारशे रुपये पहिली उचल जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर देणारा कारखाना अशी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. ही ओळख कारखान्याने यंदा देखील जाेपासली आहे. पांडुरंग साखर कारखान्याने घेतलेल्या या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close