मंगळवेढा(प्रतिनिधी) केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील शेती व फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्या बद्दल कृषिभूषण अंकुश पडवळे यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार केंद्रीय कृषीमंत्री यांच्या हस्ते यांना नुकताच प्रदान करण्यात आल्या बद्दल मंगळवेढा येथे सजग नागरिक संघ व सोलापूर सोशल फौंडेशनच्या वतीने माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते श्री पडवळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय कट्टे, सोलापूर सोशल फौंडेशनचे संचालक अजित कंडरे, सह सजग नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. पडवळे यांनी गट शेती, सेंद्रिय शेती,करार शेतीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या पुढे आदर्शवत काम केले आहे.दुष्काळी भागात अत्यंत कमी पाण्यावर शेततळ्यांच्या माध्यमातून त्यांनी आदर्शवत शेती केलेली आहे. तसेच गटशेतीच्या माध्यमातून शेडनेट शेतीचे मोठे काम केले.पडवळे यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानेही कृषिभूषण पुरस्काराने यापूर्वीच त्यांना सन्मानित केले आहे. तसेच स्वयंसेवी संस्था व निमशासकीय संस्थानीही त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना 25 पेक्षा जास्त पुरस्कार दिलेले आहेत. यामुळे यांचे विविध स्थरातून अभिनंदन होत आहे. यावेळी प्रगतशिल शेतकरी अनिल बिराजदार, विजयकुमार भरमगोंडे,भारत मासाळ, संजय माने, श्रीपती चौगुले, शहाजहान पटेल, कुशाबा पडवळे, जयराम आलदर, संतोष माळी, पिंटु शेळके, विक्रम पांढरे, दिनेश लेंगरे, रामा तांबे,इंद्रजित दवले, लक्ष्मीकांत दवले यांच्या वतीनेही तुळशीचा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी हरिभाऊ यादव यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचलन विजय कुचेकर यांनी केले तर आभार नितीन मोरे यांनी मानले.
Related Articles
Check Also
Close
-
भैरवनाथ शुगर लवंगीचे पाच मे.टन गाळपाचे उद्दिष्ट-अनिल सावंत
September 16, 2024