मंगळवेढा (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये इंग्लिश स्कुल मंगळवेढा प्रशालेतील इयत्ता पाचवीतील ५६ विद्यार्थी तर आठवीचे १०९ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ मंगळाचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम व संचालिका तेजस्विनी कदम यांच्या हस्ते सर्व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
इयत्ता पाचवीतील २०० पेक्षा जास्त गुण असणारे पाच विद्यार्थी आहेत तर १८० पेक्षा जास्त असणारे १२ विद्यार्थी आहेत. यामध्ये अदिती गवळी २३८, संचिता ओमणे२१६,ऋतुराज गरंडे२०६ ,अथर्व तळले२०६, श्रद्धा नागणे २०६ अशी गुण प्राप्त झाले आहे. या विद्यार्थ्यांना वाल्मीक मासाळ संध्या राक्षे तुकाराम हजारे व अनिल जाधव यांचे मार्गदर्शन तर आठवीमध्ये २०० पेक्षा जास्त गुण असलेले ५३विद्यार्थी आहेत तर १८० च्या पुढे १८ विद्यार्थी आहेत. प्रणव गंगे २७२,श्रुती पाटील २६२, श्रेयश इंगवले२६२, श्रेयस पवार२६० या विद्यार्थ्यांना सतीश सावंत, विशाल माने ,शिवाजी भोसले, नर्गिस इनामदार आदींचे मार्गदर्शना लाभले. तसेच यावेळी नुकत्याच पीएचडी पूर्ण केलेल्या डॉ.पल्लवी भोजने यांचा सन्मान करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कदम, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅ सुजित कदम, सचिवा प्रियदर्शनी महाडिक ,संस्थेच्या संचालिका डॉ.मीनाक्षी कदम, शिवशंभो महिला पतसंस्थेच्या चेअरमन तेजस्विनी कदम , प्रशालेचे मुख्याध्यापक रविंद्र काशीद ,उपमुख्याध्यापक सुनिल नागणे ,पर्यवेक्षक दिलीप चंदनशिवे,राजू काझी व सुहास माने तसेच शिक्षक व शिक्षिका ,पालक वर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.