पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व उपकेंद्रांच्या भौतिक सोई – सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्यामार्फत ९३लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार आवताडे यांनी आज दिली आहे. सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सभागृह अंतर्गत विशेष सदस्य म्हणून नुकतीच निवड झाली आहे. सदर निवडीनंतर आरोग्यासारख्या अतिशय गरजेच्या आणि महत्त्वपूर्ण सेवाक्षेत्राच्या भौतिक गरजांच्या बाबींमध्ये सुधारणा करण्यासाठी मी माझ्या कार्यालयाकडून जिल्हा नियोजन समितीकडे वेळोवेळी पाठपुरावा पत्रव्यवहार केला करुन सदर मागण्यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेल्या या निधीमुळे विविध ठिकाणच्या आरोग्य केंद्रांचे व उपकेंद्राचे रूप बदलण्यास फार मोठी मदत होणार असून, यापुढील काळामध्येसुद्धा अशा प्रकारच्या भरीव निधीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार आवताडे यांनी यावेळी सांगितले.
पंढरपूर मधील निधी मंजूर गावे व कामे –
गादेगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसविणे व सुशोभीकरण करणे तसेच पोस्टमार्टम रूम व ओ. टी रूम दुरुस्ती करणे १५ लाख रुपये, मुंढेवाडी येथील आरोग्य केंद्रामध्ये पेविंग ब्लॉक बसवणे व इतर सोयी – सुविधा करणे १० लाख रुपये, गोपाळपूर येथील उपकेंद्र दुरुस्ती ३ लाख रुपये, खर्डी येथील उपकेंद्र शौचालय दुरुस्ती आणि पाणीपुरवठा करणे ३ लाख रुपये, लक्ष्मी टाकळी येथील उपकेंद्र दुरुस्ती व पाणीपुरवठा करणे ३ लाख, वाखरी येथील आरोग्य उपकेंद्र पाणीपुरवठा करणे ३ लाख, शेटफळ(तपकीरी) येथील उपकेंद्र दुरुस्ती करणे ३ लाख, अनवली येथील उपकेंद्रला संरक्षण भिंत बांधणे ७ लाख रुपये, भाळवणी येथील उपकेंद्र दुरुस्ती ३ लाख रुपये.
मंगळवेढा निधी मंजूर गावे व कामे
आंधळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुसज्ज अशी पोस्टमार्टम रूम बांधणे व ड्रेनेज दुरुस्ती आणि छत गळती दुरुस्ती करणे ७ लाख रुपये, भोसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोस्टमार्टम रूम बांधणे व कर्मचारी निवासस्थान इमारत मधील ड्रेनेज दुरुस्ती ७ लाख रुपये, मरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पोस्टमार्टम रूम बांधणे व कर्मचारी निवासस्थान दुरुस्त करणे ७ लाख रुपये, लक्ष्मी दहिवडी येथील उपकेंद्र दुरुस्त करणे २ लाख ५० हजार रुपये, घरनिकी येथील उपकेंद्र दुरुस्ती करणे ५ लाख रुपये, पाठखळ येथील उपकेंद्राला संरक्षक भिंत बांधणे २ लाख ५० हजार रुपये, कागष्ट येथील उपकेंद्र दुरुस्ती व विद्युतीकरण करणे ३ लाख रुपये, लवंगी येथील उपकेंद्रामध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे ३ लाख रुपये, डोणज येथील उपकेंद्रामध्ये पेव्हिंग ब्लॉग बसवणे व नवीन ड्रेनेज करणे ३ लाख, निंबोणी येथील उपकेंद्र इमारत दुरुस्ती ३ लाख.
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील आरोग्य सेवेच्या भौतिक सोयी सुविधांची चौकट आणखी भक्कम होण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून उपलब्ध झालेल्या निधीमुळे तालुक्याच्या आरोग्य सेवेला मोठी चालना मिळणार आहे – डॉ शहाजी साबळे ( तपकीरी – शेटफळ)
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.