मंगळवेढा-तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीसाठी चुरशीने 84.38 टक्के पेक्षा अधिक मतदान झाले,सोड्डी,शिरनांदगी,गोणेवाडी गावात मतदान दरम्यान पोलीसांशी वादावादी घटना देखील घडल्या.
16 ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी 47 तर सदस्य पदासाठी 316 उमेदवार आखाड्यात राहिले. 50 मतदान केंद्रावर आज सकाळपासून चुरशीने मतदान झाले.16 गावातील 29939 पैकी 25264 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गावगाड्यातील सत्ता स्थापनेसाठी पाटकळ या ठिकाणी थेट सरपंच पदासाठी आठ तर डोंगरगाव येथे पाच व मारापुर,मारोळी,ढवळस, गुंजेगाव या ठिकाणी तिरंगी तर उर्वरित ठिकाणी दुरंगी लढत सरपंच पदासाठी झाले, मारापुर,गुंजेगाव, ढवळस,डोंगरगाव,खोमनाळ,तळसंगी,भालेवाडी ही गावे नदीपट्ट्यात व उजनी कालव्याच्या पट्ट्यात येत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या सधन समजली जातात त्यामुळे या गावात सत्ता मिळण्यासाठी सर्वच गटातील नेत्यांनी मोठी आर्थिक उलाढाल केली तर दुष्काळी पट्ट्यातील गोणेवाडी,पाटखळ,हाजापूर,शिरनांदगी,बावची येड्राव,मारोळी,पौट,सोड्डी, इथल्या देखील नेत्यांनी तितक्याच ताकतीने यंत्रणा हाताळली. गहू पातळीवरील सर्वच गटांनी परगावी असलेल्या उमेदवारांना वाहन करून मतदानासाठी पाचारण केले.सोड्डी मतदान केंद्रावर मतदाराबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी बाचाबाची झाले त्यामुळे सौम्य लाठीमार करावा लागला.शिरनांदगी येथे उमेदवारांला उमेदवारा ऐवजी मतदार प्रतिनिधी हा पास देण्यात आला केंद्रावर वावर झाल्यावर पोलिसाशी वादावादी झाली.शेवटी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील या घटनास्थळी हजर झाल्यानंतर या वादावर तोडगा पडला त्यानंतर सायंकाळच्या दरम्यान दंगा काबू पथक या गावात तैनात करण्यात आले गोणेवाडी येथे देखील मतदान केंद्रावर नियम मोडणाय्रा उत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला हे गाव यापूर्वीच संवेदनशील धरून पोलिसांनी ज्यादा कुमक तैनात केली होती. 16 गावातील मतदान केंद्रावर पोलीस निरीक्षक रणजीत माने सातत्याने वाॅच ठेवून होते.
शिरनांदगी 1736(1991),बावची 1100(1351),डोंगरगाव 1919(2200) हाजापूर 1055(1227) पाठखळ 2523(3036),भालेवाडी 1200(1428),येड्राव 1406(1599), गोणेवाडी 2193(2529),खोमनाळ 1367(1615),तळसंगी 2029(2354),पौट 868(1028),मारोळी 1390(1520)
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…
मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…
गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…
मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…
मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…
This website uses cookies.