पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर-आ. समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये नवीन डीपी बसविण्यासाठी आणि क्षमतावाढसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अनेक शेतकरी जनतेच्या जिव्हाळ्याची बाब असणाऱ्या डीपी सारख्या मुद्द्यावर आ. आवताडे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा सदर भरीव पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यासाठी उपलब्ध केला आहे. पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या अनेक गावांमध्ये नवीन डीपी मंजूर व्हावेत व असणाऱ्या डीपी क्षमतावाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी आ.आवताडे यांच्याकडे मागणी केली होती. सदर मागणी लक्षात घेऊन आ. आवताडे यांनी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे ओलीताखाली असेलेल्या पीकक्षेत्रांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी या निधीची तरतूद आपल्या पदरात पाडून घेतली आहे.

पंढरपूर तालुक्यातील डीपी मंजूर असणाऱ्या गावांची नावे व डीपी संख्या पुढीलप्रमाणे -पंढरपूर शहर ११ डीपी, गादेगांव २ डीपी, कोर्टी ३ डीपी, वाखरी ४ डीपी, लक्ष्मी टाकळी ३ डीपी, कासेगाव २ डीपी, बोहाळी १ डीपी, उंबरगाव २ डीपी, खर्डी ३ डीपी, तपकीरी शेटफळ १डीपी, तनाळी १ डीपी.

मंगळवेढा तालुक्यातील डीपी मंजूर असणाऱ्या गावांची नावे व संख्या पुढीलप्रमाणे – मंगळवेढा शहर १२ डीपी, आंधळगाव ७ डीपी, खुपसंगी २ डीपी, गणेशवाडी १ डीपी, कचरेवाडी १ डीपी, लोणार ३ डीपी, भोसे ३ डीपी, नंदेश्वर २ डीपी, जालिहाळ १ डीपी, कात्राळ १डीपी, हुलजंती ३ डीपी, कागष्ट २ डीपी, येळगी १ डीपी, नंदूर १ डीपी, देगांव ३ डीपी, धर्मगांव १ डीपी, गुंजेगाव १डीपी, घरनिकी १ डीपी, शिरसी १ डीपी, शेलेवाडी १ डीपी, लक्ष्मी दहिवडी १ डीपी, सलगर बु.१ डीपी, सलगर खु.१ डीपी, येळगी १ डीपी, मरवडे १ डीपी, कात्राळ २ डीपी, अरळी २ डीपी, डोणज १ डीपी, चिक्कलगी २ डीपी, रड्डे २डीपी, लवंगी १ डीपी, माचणूर २ डीपी, दामाजीनगर १ डीपी, उचेठाण २ डीपी, बठाण १ डीपी, लोणार ३ डीपी, अरळी २ डीपी, बालाजीनगर २ डीपी, सिद्धापूर १ डीपी.

पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील डीपी उभारणी व क्षमतावाढीसाठी आमदार समाधान आवताडे यांच्या अथक प्रयत्नांतून तब्बल ६ कोटी ४९ लाख रुपये निधी मंजूर झाल्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा मिळणार आहे. सदर विकसनशील आणि शेतकरीहितकारक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. समाधान आवताडे यांची विकासाभिमुख कार्याची प्रतिमा आणखी मजबूत झाली आहे.
राजकुमार यादव – प्रगतशील बागायतदार (मारापूर )

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.