तामदर्डी येथे भीमा नदीवर बंधारा बांधण्यासाठी 35 कोटी मंजूर -आ.समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे बंधारा बांधण्याची मागणी केली होती त्यानुसार भीमा नदीवर कोप बंधारा बांधण्यासाठी 34 कोटी 99 लाख 43 हजार 406 रुपये मंजूर झाले असून त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या बंधार्‍यामुळे तमदर्डी, बोराळे, मुंढेवाडी माचनूर,ब्रह्मपुरी,रहाटेवाडी तर मोहोळ तालुक्यातील आरबळी, मिरी, बेगमपूर, अर्धनारी येनकी या गावातील क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

यावेळी बोलताना आमदार आवताडे म्हणाले की सदर बंधारा उभारणीसाठी येथील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने केली, सदर बंधाऱ्याच्या ठिकाणी शेतकरी दरवर्षी उन्हाळ्यात पिके वाचवण्यासाठी मातीचा बांध घालून पाणी आडवत होते येथील संबंधित शेतकऱ्यांनी माझ्याकडे येऊन या बंधाऱ्यासाठी पाठपुरावा करा अशी मागणी केल्यानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी करून या बंधाऱयाला तात्काळ मंजुरी द्या अशी मागणी केली होती त्यानुसार सरकारने संबंधित बंधाऱ्याला निधी देऊन येतील शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत बंधारा मंजूर केला आहे.

या मंजुरीच्या शासन निर्णयामध्ये असे म्हटले आहे की बंधार्‍याची पाणी वाटप संस्था करण्यासाठी ठेकेदारास बंधनकारक करण्यात यावे,कामाचा खर्च उपलब्ध अनुदानातून प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत करण्यात यावा, व नियोजित वेळेत काम पूर्ण करण्यात यावे. सदरचे काम पूर्ण होईपर्यंत त्रैमासिक प्रगती अहवाल शासनास सादर करावा. काम पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतचा पूर्णत्वाचा अहवाल शासनास सादर करावा. कामाचे जिओ टॅगिंग व व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक राहील. या कामाचा पाच टप्प्यात जिओ टॅगिंग व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावा. व्हिडिओ चित्रीकरण करताना प्रत्येक वेळेस कामाचे जलसंधारण अधिकारी व कंत्राटदार यांच्या प्रशिक्षित तांत्रिक कर्मचारी यांची उपस्थिती अनिवार्य आहे. काम चालू असताना व पूर्ण झाल्यानंतर कामाची गुण नियंत्रणाच्या दृष्टीने विभागाच्या दक्षता व नियंत्रण पथकाकडून तपासणी करण्यात यावी. प्रकल्पाचे हस्तांतरण झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीचा खर्च लाभार्थ्याकडून करण्यात यावा. आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा नवीन घटकांचा शासन मान्यते शिवाय प्रकल्पात समावेश करण्यात येऊ नये.अशा अनेक अटींसह कोप बंधाऱ्यास मंजुरी दिली असून या मंजुरीमुळे येथील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार असून लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

 

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.