पंढरपूरमंगळवेढा

मंगळवेढ्यातील 27 पैकी 24 ग्रामपंचायत बिनविरोध!

मंगळवेढा(प्रतिनिधी) मंगळवेढा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून उपसरपंचाच्या निवडी झाल्या. त्यामध्ये 23 ग्रामपंचायतीचे उपसरपंच हे बिनविरोध निवडले तर चार ग्रामपंचायतीचे उपसरपंच हे निवडणुकीतून विजयी झाले.   एकाच दिवशी तालुक्यातील 27 गावाच्या उपसरपंचाच्या निवडी थेट जनतेमधून निवडलेल्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.त्यामध्ये नंदुर, शेलेवाडी, लक्ष्मी दहिवडी,रड्डे चार गावाच्या उपसरपंच पदासाठी मतदान झाले. त्यामध्ये नंदुर येथे उपसरपंच पदासाठी कल्लाप्पा बगले व तुकाराम हनमने यांना समान मतदान झाल्यामुळे निर्णायक मत सरपंच सुमन गोडसे यांनी कल्लाप्पा बगले यांच्या पारड्यात टाकले. तर लक्ष्मी दहिवडी येथे सुजाता शिंगाडे आणि शकुंतला टाकले यांच्यात मतदान झाले. सुजाता शिंगाडे यांच्या बाजूने नऊ तर शकुंतला टाकले यांच्या बाजूने चार मते पडली.रड्डे येथे सारिका खांडेकर व अमोल माने यांच्यात मतदान झाले.त्यात सारिका खांडेकर यांना सात तर अनिल माने यांना पाच मते पडली. शेलेवाडी येथे सुवर्णा चव्हाण व मनोज चव्हाण यांच्यात मतदान झाले त्यामध्ये सुवर्णा चव्हाण या विजयी झाल्या. हिवरगाव येथे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झालो त्यांनी सरपंच पद स्वताकडे तर  विरोधी गटाला उपसरपंच पद देऊ केले त्यामध्ये अश्विनी लवटे या बिनविरोध निवडल्या गेल्या.निवडीनंतर फटाक्याची आतीषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला.  गावनिहाय नवनिर्वाचित उपसरपंच पुढील प्रमाणे:- सुवर्णा चव्हाण (शेलेवाडी), शहाजी आवताडे (शिरशी), अशोक जाधव (खडकी), अर्चना कांबळे (जुनोनी), सिताराम बनसोडे (देगाव),अमोल सरवदे (अकोला), राजू बेदरे (बठाण), संगीता सोनवणे (उचेठाण),निलाबाई कटरे (ममदाबाद हु.), किसाबाई सरगर (रेवेवाडी) नवनाथ मेटकरी (चिक्कलगी),सुजाता लिघाडे (भाळवणी) काशीराम चौगुले ( जंगलगी),शांताबाई शिंदे (डिकसळ) रमेश ठेंगील (मुंढेवाडी) प्रकाश भोसले खुपसंगी) शिवनेरी खांडेकर (निंबोणी), ललिता मदने (लोणार), मीनाक्षी शिंदे (मानेवाडी), सुजाता शिंगाडे (लक्ष्मी दहिवडी) सारिका खांडेकर ( रड्डे) कल्लाप्पा बगले (नंदुर),भारत लेंडवे (आंधळगाव),केराप्पा बावधने (पडोळकरवाडी),भीमू कोरे (जालीहाळ) अश्विनी लवटे (हिवरगाव), संदीप पाटील (ब्रह्मपुरी)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close