पर्यटन विभागाकडुन कृष्ण तलाव सुशोभीकरणासाठी अडीच कोटी मंजूर-आ.समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी राज्य पर्यटन विभागाअंतर्गत २ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला असून यामधून तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना आ आवताडे म्हणाले की,अध्यात्मिक आणि सांप्रदायिक विचारांची वैभवशाली परंपरा असलेल्या या मतदारसंघात विविध पर्यटन स्थळे विकसित करून येथील पर्यटन संकल्पनेला चालना देण्यासाठी व पर्यटन स्थळांची निर्मिती कारण्यासाठी निधीची आवश्यकता होती सदर पर्यटन विकास निधीमुळे दोन्ही शहरामधील पर्यटन स्थळांचा लौकिक वाढविण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे.पर्यटन आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मतदार संघातील विविध ठिकाणांचा विकास करणेकामी निधीसाठी राज्य पर्यटन विभागाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून या निधीची मागणी केली होती.या मागणीची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे ना.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व पर्यटन मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमातून व सहकार्यातून हा निधी मंजूर झाला असल्याचे आ आवताडे यांनी आहे.

सदर निधी अंतर्गत मंजूर झालेली कामे पुढील प्रमाणे –

मंगळवेढा येथील कृष्ण तलाव सुशोभीकरण अंतर्गत येथे खडीकरण व डांबरीकरण करणे, तारेचे कुंपण करणे,पेव्हिंग ब्लॉक बसवणे,वृक्षारोपण करणे, बैठक व्यवस्था करणे, नाला बांधकाम करणे,व विद्युतीकरण करणे.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

6 months ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

6 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

7 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

7 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

9 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

9 months ago

This website uses cookies.