21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. वाढत्या धावपळीच्या युगात जीव घेण्या स्पर्धेत अति महत्त्वाकांक्षाच्या युगामध्ये स्वतःला सामावून घेताना होणारी मनाची अस्वस्थता शारीरिक, बौद्धिक ,मानसिक , गुंता यातून निर्माण होत असलेले विविध  नैराश्य, डिप्रेशन, नर्वसनेस  एन्जॉयटी अल्झायमर यासारखे रोगांवर यशस्वीपणे ध्यानाच्या माध्यमातून मात करून स्मरणशक्ती वाढवणे एकाग्रता वाढवणे आणि आनंदी, निरामय निष्काम जीवन जगणे यासाठी ध्यानाचा उपयोग केला जाऊ शकतो. ही गोष्ट संपूर्ण जगाला आज समजलेली आहे ध्यान ही आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी संपूर्ण जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे हे आज संपूर्ण जगाने मान्य केलेले आहे.

या निमित्ताने पतंजली योग परिवार मंगळवेढा व सहज मार्ग ध्यान हार्टफुलनेस यांच्या वतीने शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी संजीवनी वेलनेस सेंटर नर्मदा पार्क कृष्ण तलावाशेजारी मंगळवेढा येथे सायंकाळी 4:00 ते 5:30 या वेळेत पहिला ध्यान दिवस साजरा करण्यात येणार आहे यावेळी 1.ध्यानाचे महत्त्व–4:00 ते 4:30

2.ध्यानाची विधी–4:30ते 5:00

3. प्रत्यक्ष ध्यान सत्र-5:00 ते 5:30

  अशा तीन टप्प्यात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी  जयदीप गजानन रत्नपारखी, इनर व्हील क्लब ऑफ मंगळवेढा, संजीवनी वेलनेस सेंटर व पतंजली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी मंगळवेढा शहर व पंचक्रोशीतील सर्व आरोग्य प्रेमी बंधू-भगिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मास्टर योगा टीचर नितीन मोरे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता योगशिक्षक संतोष दुधाळ, प्रफुल्लता स्वामी, आशा नागणे आगतराव बिले,दत्ता भोसले, पत्रकार महादेव धोत्रे, संतोष माने, प्रशांत काटे, मिलिंद कुलकर्णी राजू माळी, अनिरुद्ध देशपांडे, राहुल घुले इत्यादी प्रयत्न करत आहेत.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

9 months ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

10 months ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

10 months ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

11 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

11 months ago

छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या सुवर्णमहोत्वानिमित्त संतनगरी मंगळवेढा या पुस्तकाचे प्रकाशन!

मंगळवेढा-छत्रपती शिवाजी तरुण मंडळ शिवाजी तालीम वडार गल्ली,मंगळवेढा या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संतनगरी मंगळवेढा…

11 months ago

This website uses cookies.