21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!
युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. वाढत्या धावपळीच्या युगात जीव घेण्या स्पर्धेत अति महत्त्वाकांक्षाच्या युगामध्ये स्वतःला सामावून घेताना होणारी मनाची अस्वस्थता शारीरिक, बौद्धिक ,मानसिक , गुंता यातून निर्माण होत असलेले विविध नैराश्य, डिप्रेशन, नर्वसनेस एन्जॉयटी अल्झायमर यासारखे रोगांवर यशस्वीपणे ध्यानाच्या माध्यमातून मात करून स्मरणशक्ती वाढवणे एकाग्रता वाढवणे आणि आनंदी, निरामय निष्काम जीवन जगणे यासाठी ध्यानाचा उपयोग केला जाऊ शकतो. ही गोष्ट संपूर्ण जगाला आज समजलेली आहे ध्यान ही आपल्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी संपूर्ण जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे हे आज संपूर्ण जगाने मान्य केलेले आहे.
या निमित्ताने पतंजली योग परिवार मंगळवेढा व सहज मार्ग ध्यान हार्टफुलनेस यांच्या वतीने शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 रोजी संजीवनी वेलनेस सेंटर नर्मदा पार्क कृष्ण तलावाशेजारी मंगळवेढा येथे सायंकाळी 4:00 ते 5:30 या वेळेत पहिला ध्यान दिवस साजरा करण्यात येणार आहे यावेळी 1.ध्यानाचे महत्त्व–4:00 ते 4:30
2.ध्यानाची विधी–4:30ते 5:00
3. प्रत्यक्ष ध्यान सत्र-5:00 ते 5:30
अशा तीन टप्प्यात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जयदीप गजानन रत्नपारखी, इनर व्हील क्लब ऑफ मंगळवेढा, संजीवनी वेलनेस सेंटर व पतंजली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. तरी मंगळवेढा शहर व पंचक्रोशीतील सर्व आरोग्य प्रेमी बंधू-भगिनींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मास्टर योगा टीचर नितीन मोरे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता योगशिक्षक संतोष दुधाळ, प्रफुल्लता स्वामी, आशा नागणे आगतराव बिले,दत्ता भोसले, पत्रकार महादेव धोत्रे, संतोष माने, प्रशांत काटे, मिलिंद कुलकर्णी राजू माळी, अनिरुद्ध देशपांडे, राहुल घुले इत्यादी प्रयत्न करत आहेत.