आचार्य नारायण गुरुजी यांच्या ध्यान प्राणायाम आहार या त्रिसूत्रीवर आधारित शिबिरांचे 1500 साधकांनी घेतला लाभ!
मंगळवेढ्यातील साधकांने दिला स्वच्छेताचा संदेश!
मंगळवेढा(प्रतिनिधी) प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने मंगळवेढा सुरू असलेल्या शिबिरातील 85 साधकांनी शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवले.आतापर्यत मंगळवेढा येथील शिबीरामध्ये 14 बँचेसच्या माध्यमातून 1500 साधकांनी लाभ घेतला.
या केंद्राच्या वतीने मार्गदर्शक आचार्य नारायण गुरुजी यांनी ध्यान प्राणायाम आहार या त्रिसूत्रीवर आधारित शिबिर 18 नोव्हेंबर पासून येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय सुरू होते. या शिबिरामध्ये चुकीची जीवनशैली,आहारातील बदलामुळे शरीरावर होणार झालेले दुष्परिणाम, या विषयावर मार्गदर्शन करताना आचार्य नारायण गुरूजी म्हणाले,आपली प्राचीन भारतीय संस्कृती श्रेष्ठ आहे. पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आपण जोपासली पाहिजे.अलीकडच्या काळात आपण पाश्चात्य देशातील लोकांचे अनुकरण करत आहोत. त्यामुळे आपणच आपले आरोग्य बिघडवायला कारणीभूत आहोत. आपल्याच देशातील ऋषीमुनी दीडशे-दोनशे वर्ष जगायचे. परंतु आत्ताचा काळा हा ७०ते ७६ वर्षापर्यंतचा काळ राहिला आहे .पाश्चात्य देशातल्या लोकांनी आहारावर अभ्यास केला.विविध देशातील लोकांच्या आहाराबाबत माहिती जाणून घेतली.त्यावेळी त्यांना भारतीय आहार उत्तम वाटला. म्हणून त्यांनी भारतातील आहार सुरू केला आणि आपण पाश्चात्य देशातील आहार स्वीकारला. त्यामुळे आपले आरोग्य बिघडत गेले.आपल्या शरिरावर अनावश्यक चरबी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक आजारांना आपण आमंत्रण देत आहोत.
प्राणायम,योगासन,व्यायाम व योग्य आहार घेतला तर तुम्हाला कोणताही रोग होणार नाही. तसेच आयुष्यमान दिर्घकाळ राहिल. तसेच महिलांनी मुलांना घडवत असताना आपल्या इच्छा आकांक्षा त्याच्यावर लादू नका आयुष्यात त्याला जे घडायचे आहे ते मुलांच्या इच्छेप्रमाणे करू द्या.व्यायाम प्राणायाम व योग्य आहार याबाबत प्रबोधन आचार्य नारायण गुरुजी यांच्या कडून प्रबोधन केले . पंधरा दिवसाच्या शिबिरातील आठव्या दिवशी शिबिरातील 85 सहभागी साधकांनी आठवडा बाजार, दामाजी मंदिर परिसर, गणेश भाग ,नगरपालिका शाळा, चोखामेळा चौक आदी परिसर स्वच्छ केला. या शिबिरामध्ये मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, मारुती बापु वाकडे,मोहन लेंडवे व महिला साधकांने ही आपले अनुभव व विचार व्यक्त केले.