जमिनीतील गुप्त धन काढून देण्याचा बहाणा करून 13 लाख 44 हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदु पिता पुत्रांना पाच दिवसाची पोलिस कोठडी

मंगळवेढा(प्रतिनिधी) जमिनीतील गुप्त धन काढून देतो,करणीबाधा घालवतो,घरात भांडणे होवू देत नाही असा बहाणा करून घरात धुप अंगारे जाळून 13 लाख 44 हजार 900 रुपये रोख व फोन पे च्या माध्यमातून घेवून फसवणूक केल्याप्रकरणी महाराज तथा भगवान उर्फ सुदर्शन जगन्नाथ स्वामी,मुलगा विरभद्र उर्फ उदय भगवान उर्फ सुदर्शन स्वामी रा.मालवंडी ता.बार्शी या पिता पुत्रांना पोलिसांनी अटक करून मंगळवेढयाच्या न्यायाधीश एस.एन.गंगवाल-शहा यांचेसमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी मायाक्का रेवणसिध्द मोटे(रा.नंदेश्‍वर) यांना वरील दोघा पिता पुत्र आरोपींनी जुलै 2022 ते आजतागायत या कालावधीत फिर्यादीचे मयत पती रेवणसिध्द तसेच गावातील मल्हारी करे,चेतन वाघमोडे,तानाजी सरग,सुशिलकुमार गवळी(रा.जयभवानी नगर,मंगळवेढा)आदींना करणीबाधा घालवतो,घरात भांडणे होवू देत नाही,घरातील व जमिनीतील गुप्त धन काढून देतो असे भासवून होमहवन करून फिर्यादीचे पती रेवणसिध्द यांना काठीने पायावर,पाठीवर जबर मारहाण करून डाव्या पायाचे हाड मोडून घरातील लोकांना पांढरी पावडर पाजून सर्वांकडून 13 लाख 44 हजार 900 रुपये रोख व फोन पेच्या माध्यमातून घेवून वरील लोकांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल होती.तपासिक अंमलदार पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी पोलिसांच्या मदतीने मालवंडी ता.बार्शी येथे जावून पिता पुत्रांना तात्काळ अटक करून मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि.19 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यात आरोपीतर्फे अ‍ॅड.धनंजय हजारे,अ‍ॅड.सीमा ढावरे,अ‍ॅड.सुषमा माने यांनी तर सरकारपक्षाकडून अ‍ॅड.धनंजय बनसोडे यांनी काम पाहिले.

मुख्य संपादक: महादेव धोत्रे

Recent Posts

21 डिसेंबर रोजी पहिल्या विश्व ध्यान दिवसाचे आयोजन!

युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून नुकताच 21 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला…

3 days ago

बीड हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करा मंगळवेढ्यातील सकल मराठा समाजाचे पोलिसांना निवेदन

मंगळवेढा (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच मराठा सेवक संतोष देशमुख यांच्या केलेल्या क्रूर…

1 week ago

विकासाभिमुख परिवर्तनासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांसाठी मला आणखी एका संधीतून सेवेचा आशीर्वाद द्या – आ समाधान आवताडे

  गेल्या तीन वर्षांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावा-गावात जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अडी-अडचणी समजून घेतल्या…

1 month ago

भगीरथ भालकेंना मोठा धक्का; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

  पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस…

1 month ago

निंबोणी येथील पशुसंवर्धन दवाखान्यासाठी ५० लाख निधी मंजूर-आ समाधान आवताडे

मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आ-समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी…

3 months ago

कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सामावून घेण्याची आ समाधान आवताडे यांनी केली महसूल मंत्री विखे-पाटील यांच्याकडे मागणी!

मंगळवेढा(प्रतिनिधी) राज्याच्या महसूल विभागातील कोतवाल कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निश्चित करून शासकीय सेवेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी…

3 months ago

This website uses cookies.